पिंपरी-चिंचवड (पुणे)- शहरात दररोज शेकडो कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. शनिवारी देखील 124 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून पैकी 17 रुग्ण हे शहराच्या हद्दीबाहेरील आहेत. दरम्यान, शनिवारी उपचारादम्यान तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 83 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 हजर 676 वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. क्रांतीनगर आकुर्डी येथील 58 वर्षीय पुरुष तर जुन्नर येथील 30 वर्षीय आणि पुण्यातील कोथरुड येथील 57 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी सर्वाधिक 124 कोरोनाबाधित आढळले; तीन रुग्णांचा मृत्यू - पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट
शनिवारी उपचारादम्यान तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 83 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. शहरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 676 वर पोहोचली आहे.
शनिवारी कोरोनाबाधित आलेले रुग्ण हे निराधारनगर पिंपरी, नेहरुनगर, मोरेवस्ती चिखली, नानेकरचाळ पिंपरी, सिध्दार्थ चाळ पिंपरी, भोसरी, शिवसाईनगर दिघी, सोनिगरा चिंचवड, जगताप डेअरी पिंपळे निलख, दुर्गानगर चिखली, दत्तनगर चिंचवड, यमुनानगर, साईबाबानगर चिंचवड, त्रिमुर्तीनगर चिंचवडगाव, वैदुवस्ती पिंपळे गुरव, जयभिमनगर दापोडी, पंचशील नगर पिंपळे निलख, पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी, आनंदनगर चिंचवड, सेक्टर-४ मोशी, जुनी सांगवी, गणेशनगर पिंपरी, संत तुकारामनगर पिंपरी, खान्देशनगर मोशी, मोरवाडी, दिघीरोड भोसरी, गणेशनगर सांगवी, बौध्दनगर पिंपरी, विद्यानिकेतन निगडी, विशालनगर पिंपळे निलख, इंद्रायणीनगर भोसरी, डिलक्स चौक पिंपरी, मोरयानगर चिंचवडगाव, प्रियदर्शननगर सांगवी, रामनगर चिंचवड, पुर्णानगर चिंचवड, स्विसकाउंटी थेरगाव, कुंजीरवस्ती पिंपळे सौदागर, अजंठानगर, विठ्ठलनगर पिंपरी, महात्मा फुलेनगर पिंपरी, अष्ठविनायक कॉलनी काळेवाडी, टिळक कॉलनी थेरगाव, शिरपुर धुळे, देहुरोड कॅन्टोनमेंट, खडकी, कोथरुड, मंगळवार पेठ, कल्याणीनगर, कोंढवा, बोपोडी, नवीपेठ, जुन्नर, येथील रहिवासी आहेत.
तर जयभिम नगर दापोडी, कस्पटेवस्ती थेरगाव, अजंठानगर, बौध्दनगर पिंपरी, साईबाबनगर चिंचवड, गुलाबनगर दापोडी, महात्मा फुले सोसायटी निगडी, नानेकरचाळ पिंपरी, शाहुनगर चिंचवड, सदगुरु कॉलनी वाकड, बालाजीनगर भोसरी, आळंदीरोड भोसरी, पत्राशेड पिंपरी, गणेशम पिंपळे सौदागर, जयरामनगर जुनी सांगवी, पवारवस्ती दापोडी, माऊली चौक वाकड, विनायकनगर पिंपळे निलख, काळेवाडी, सिध्दार्थनगर दापोडी, दिघीरोड भोसरी, काळभोरनगर, आनंदनगर चिंचवड, दत्तनगर दिघी, संततुकाराम नगर भोसरी, नेहरुनगर, भाटनगर, बोपखेल, वैभवनगर पिंपरी, मिंलीदनगर पिंपरी, त्रिवेणीनगर, शिंदेनगर जुनी सांगवी, मोरेवस्ती चिखली, औंध, जुन्नर, खेड, खडकी व चाकण येथील रहिवासी असलेले कोविड-19 बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.