महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी आढळले 49 कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या 1373 वर

शहरात आत्तापर्यंत 44 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून, 900 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले असून ते ठणठणीत बरे झालेले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ycm hospital
पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी आढळले 49 कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या 1373 वर

By

Published : Jun 18, 2020, 9:42 AM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात बुधवारी नव्याने 49 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मोशी येथील 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील बाधितांची संख्या 1 हजार 373 वर पोहोचली असून 38 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, 900 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले असून ते ठणठणीत बरे झालेले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाबाधित रुग्ण -

बुधवारी आढळलेले कोरोनाबाधित आलेले रुग्ण हे, शिंदेनगर जुनी सांगवी, यमुनानगर निगडी, पंचतारानगर आकुर्डी, विशाल ईस्केअर पिंपरी, क्रांतीनगर आकुर्डी, संततुकारामनगर भोसरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, शास्त्रीनगर पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी, साईबाबा नगर चिंचवड, वाल्हेकरवाडी, वैभवनगर पिंपरी, आनंदनगर पिंपळेगुरव, गुलाबनगर दापोडी, कुदळवाडी, कासारवाडी, शिवशाहीनगर दिघी, तालेरानगर चिंचवड, पिंपरी, पिंपळे सौदागर, बौध्दनगर पिंपरी, वडगाव शेरी, म्हाळुंगे खेड, देहूरोड, येरवडा, आंबेगांव, कोथरुड येथील रहिवासी आहेत.

बरे झालेले रुग्ण -

आनंदनगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, भारतनगर पिंपरी, सद्गुरुकॉलनी वाकड, बौध्दनगर, अशोकनगर पिंपरी, सिध्दार्थनगर दापोडी, पिंपळेगुरव, पिंपरीगांव, गवळीनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, वडमुखवाडी च-होली, गवळीनगर भोसरी, संगमनगर जुनी सांगवी, बोपखेल, एम.बी.कॅम्प देहूरोड, दिघीरोड भोसरी, खंडोबामाळ भोसरी, दत्तमंदीर वाकड, खराळवाडी, दापोडी येथील रहिवासी असलेले कोविड-19 बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details