पुणे - पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरुवारी दिवसभरात कोरोनामुळे आणखी 6 जणांचा मृत्यू झाला असून, 472 नवीन रुग्ण आढळले. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 487 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनाचे 11 हजार 115 रुग्ण झाले आहेत. गुरुवारी 193 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यातील 245 रुग्ण गंभीर असून, यातील 49 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
पुण्यात गुरुवारी आढळले कोरोनाचे 472 नवीन रुग्ण तर, 6 जणांचा मृत्यू
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाचे 11 हजार 115 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 6 हजार 906 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात बऱ्या झालेल्या 193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाचे 11 हजार 115 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 6 हजार 906 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात बऱ्या झालेल्या 193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महापालिकेच्या विविध रुग्णालयांत अजूनही 3 हजार 722 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 487 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 11 हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागांत कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या जास्त आहे.