पुणे - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन केला. मात्र यानंतरही पुण्यातील रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान 31 जुलैला पुण्यात बाधित रुग्णांची संख्या 60 हजारावर जाईल, तर 27 हजार सक्रीय रुग्ण असतील. तसेच 20 ते 25 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात साधारण एक लाख बाधित रुग्ण असतील, तर सक्रीय रूग्ण 48 हजार असणार आहेत. पुणे शहरात, जिल्ह्यातील 30 टक्के रुग्ण संख्या आहे. त्यामुळे या रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे, असे पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी बोलताना रुबल अग्रवाल यांनी शहरातील कोरोना आणि उपाययोजनांची माहिती दिली. रुग्णांची माहिती वेळेवर न देणाऱ्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या 25 रुग्णालयांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली. तर 10 रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांनी घरी राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी कोरोनाचा आढावा घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे. लॉकडाऊन काळात दररोज 12,411 सँपल घेतले आहेत. तर मृत्युदर 2.74 वरुन 2.38 घसरला आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढत आहेत. ही गैरसोय जम्बो रुग्णालय झाल्यावर टळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कोरोनासाठी 18 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून तो जिल्ह्याला वितरित केला असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
'ऑगस्टअखेरीस पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या लाखाच्या घरात असेल' - कोरोना लाईव्ह अपडेट
पुण्यात रुग्णांची माहिती वेळेवर न देणाऱ्या आणि निष्काळजीपणा करणाऱ्या 25 रुग्णालयांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली. तर 10 रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तर लक्षणे नसणाऱ्या रुग्णांनी घरी राहण्याचे आवाहन अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले.
पुणे कोरोना अपडेट
दरम्यान, पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ४४ नवे रुग्ण आढळले असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या नविन रुग्णांसह बाधितांची एकूण संख्या ७२ हजार ७८२ झाली असून आतापर्यंत १ हजार ७३७ जणांचा मृत्यू झाला आहे.