पिंपरी-चिंचवड(पुणे) - शहरात आज नव्याने ३८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात ८ रुग्ण हे शहराबाहेरील असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, आंबेगाव येथील वृद्धावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या ६४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या नवीन रुग्णांसह शहरातील बाधितांची संख्या ७०८ वर पोहचली आहे.
दरम्यान, आतापर्यंत शहरातील ४३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर एका ६४ वर्षीय जेष्ठ व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज बाधित आढळलेले रुग्ण हे आनंदनगर, पिंपळेगुरव, बौध्दनगर, सांगवी, भाटनगर, बॉईज हॉस्टेल, वाय.सी.एम.हॉस्पीटल, अजिंठानगर, गुरुदत्तनगर पिंपरी, लिंकरोड पिंपरी, जनतानगर चिंचवड, रुपीनगर, दत्तनगर वाकड, चिंचवड, आनंदपार्क निगडी, खराळवाडी, दापोडी, खेड, जुन्नर, डेक्कन पुणे, येरवडा, शिवाजीनगर, देहूरोड आणि चाकण येथील रहिवासी आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये ३८ बाधित रुग्णांची नोंद; ३६ जणांना डिस्चार्ज
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज शहरात ३८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने ३८ बाधित रुग्ण आढळले
तर घरी सोडण्यात आलेले रुग्ण हे भोसरी, आनंदनगर, वाकड, बौध्दनगर, पिंपरी, किवळे, भाटनगर, अशोकनगर पिंपरी, दापोडी, कासारवाडी, आंबेगांव, खेड व शिक्रापूर येथील रहिवासी आहेत.