पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी 557 कोरोना रुग्णांची नोंद - pimpri chinchwad corona update
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे तर कोरोना रुग्ण आढळतच आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून शहरात दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंगळवारपासून दहा दिवसांचे लॉकडाऊन लागू करण्यात आले. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरात 557 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. दरम्यान, 281 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील बाधितांची संख्या 8 हजार 171 वर पोहचली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे तर कोरोना रुग्ण आढळतच आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून शहरात दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. संचारबंदी असल्याने नागरिक घराबाहेर पडले नाहीत. मात्र, पहिल्याच दिवशी शहरात एकूण 557 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 281 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 4 हजार 879 जण कोरोनामुक्त झाले, त्याच बरोबर शहरातील 129 तर ग्रामीण भागातील 44 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.
मंगळवारी मृत झालेला रुग्ण थेरगाव (स्त्री, ३० वर्षे), इंद्रायणीनगर भोसरी (पुरुष, ६९ वर्षे), कासारवाडी (पुरुष, ६४ वर्षे), घरकुल चिखली (स्त्री, ६५ वर्षे), चिंचवड (पुरुष, ४२ वर्षे), मोशी (स्त्री, ५३ वर्षे), नेहरुनगर (पुरष, ५० वर्षे), तळवडे (पुरुष,५७ वर्षे), आनंदनगर चिंचवड (पुरुष,४८ वर्षे), तळेगांव रोड (पुरुष,५८ वर्षे), पुणे (पुरुष,८० वर्षे) येथील रहिवासी आहे.