महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात आढळले 154 कोरोनाबाधित; 3 जणांचा मृत्यू - पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 154 कोरोनाबाधित

पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने 154 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. बोपखेल, पिंपरी आणि पुणे येथील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आत्तापर्यंत एकूण 68 जण कोरोनामुळे दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 117 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

In Pimpri-Chinchwad, 154 corona bites were found during the day
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात आढळले 154 कोरोनाबाधित

By

Published : Jun 26, 2020, 9:46 PM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने 154 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, यात ग्रामीण भागातील काही रुग्णांचा समावेश आहे. तर बोपखेल, पिंपरी आणि पुणे येथील तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आत्तापर्यंत एकूण 68 जण कोरोनामुळे दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 117 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 हजार 405 पोहचली असून नागरिकांच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. शहरातील 2 हजार 405 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 हजार 593 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. तर 68 जणांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. दरम्यान, काही भागात मास्क आणि सोशल डिस्टसिंग पाळण्यात आले नसल्याने तेथील बाजार पेठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आज मृत झालेले रुग्ण केसरी नगर बोपखेल (स्त्री, वय- ६५वर्षें), रमाबाईनगर पिंपरी ( पुरुष, वय- ६० वर्षें ) व सिंहगड रोड पुणे ( स्त्री, वय- ७५ वर्षें ) येथील रहिवासी आहे.आज बाधित आलेले रुग्ण हे, अजंठानगर, जयभीम नगर दापोडी, पवारनगर थेरगाव, गांधी वसाहत नेहरुनगर, भाटनगर पिंपरी, वैदुवस्ती पिंपळे गुरव, कुलदिप अंगण नेहरुनगर, संत तुकाराम नगर भोसरी, साईपार्क नेहरुनगर, डांगे थेरगाव, एचडीएफसी कॉलनी चिंचवड, भोईर ब्रीज आकुर्डी, चिखली रोड, केशवनगर कासारवाडी, आनंदनगर चिंचवड, घरकुल, नव महाराष्ट्र स्कुल पिंपरी, कृष्णानगर चिंचवड, धावडेवस्ती भोसरी, नाशिक फाटा कासारावाडी, रमाबाईनगर पिंपरी, गांधीनगर, बोपखेल गाव, मोरेवस्ती चिखली, तापकीरनगर काळेवाडी, दळवीनगर, बौध्दविहार दापोडी, सिध्दार्थ कॉलनी काळेवाडी, विठ्ठलनगर, कस्पटेवस्ती वाकड, तुळजाई कॉलनी थेरगाव, मिलींदनगर पिंपरी, जयगणेश साम्राज्य भोसरी, जाधव पार्क आकुर्डी, पदमजी पेपर मिल थेरगाव, महात्मा फुलेनगर चिंचवड, साने वस्ती चिखली, नटराज सोसायटी नेहरुनगर, निगडी प्राधिकरण, पवारनगर जुनी सांगवी, संभाजीनगर भोसरी, श्रीनगर थेरगाव, रिव्हर रोड पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, वडमुखवाडी, महाडा बिल्डिंग पिंपरी, महिंद्रा बिल्डिंग पिंपरी, राजे शिवाजीनगर चिखली, ग्रीन एम्पायर चिखली, हिराबाई झोपडपट्टी कासारवाडी, काटेपुरम नवी सांगवी, पाटीलनगर चिखली, ममता नगर सांगवी, पिं. सौदागर, काळजेवाडी च-होली, दोस्ती बेकरी नेहरुनगर, विशालनगर, साईबाबानगर चिंचवड, रामनगर रहाटणी, मॉडल कॉलनी शिवाजीनरगर, बोपोडी, सिहंगड रोड, देहुगाव, बिबेवाडी, दत्तवाडी, गोखलेनगर, पुणे येथील रहिवासी आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details