महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 29, 2022, 5:56 PM IST

ETV Bharat / state

मंत्र्यांना फराळाला वेळ आहे, मात्र नेट-सेट पीएचडी धारकांसाठी वेळ नाही; कृती समितीचा आरोप

नेट-सेट पीएच डी धारक संघर्ष समितीचे उच्च शिक्षण संचालनालय पुणे येथील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, आज शनिवार (दि. 29 ऑक्टोबर)रोजी या समितीच्यावतीने सेंट्रल बिल्डिंग ते सावित्रीबाई फुले विद्यापीठापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे उच्च शिक्षण कार्यालयासमोर नेट सेट पीएचडी धारक संघर्ष कृती समितीच्य वतीने हे आंदोलन
पुणे उच्च शिक्षण कार्यालयासमोर नेट सेट पीएचडी धारक संघर्ष कृती समितीच्य वतीने हे आंदोलन

पुणे - गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची भरती बंद आहे. त्यामुळे नेट-सेट पीएचडी या उच्च पदव्या घेऊन बेरोजगारीत दिवस कंठीत असणाऱ्या तरुणांची सहनशीलता संपली आहे. दरम्यान, सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी राज्यभरात आंदोलन पुकारले असून गेल्या तीन दिवसांपासून पुणे उच्च शिक्षण कार्यालयासमोर नेट सेट पीएचडी धारक संघर्ष कृती समितीच्य वतीने हे आंदोलन सुरू आहे. आज शनिवार (दि. 29 ऑक्टोबर)रोजी या समितीच्यावतीने सेंट्रल बिल्डिंग ते सावित्रीबाई फुले विद्यापीठापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी यावेळी संघर्ष समितीच्या वतीने सेट भवनाला टाळे ठोकण्यात येणार आहे.

पुणे उच्च शिक्षण कार्यालयासमोर नेट सेट पीएचडी धारक संघर्ष कृती समितीच्य वतीने हे आंदोलन

संघर्ष समितीच्या सदस्यांनी पुढील मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे
१) केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार १००% सहायक प्राध्यापक भरती झाली पाहिजे.
२) वेठबिगारीचा पुरस्कार करणारे तासिका तत्व धोरण बंद करून समान काम समान वेतन मिळाले पाहिजे.
३) सुरू असलेली प्राध्यापक भरती (२०८८) गतीमान करून पुढील १००% सहायक प्राध्यापक भरती सुरू करावी.
४) विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नेमणूक करावी.

रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही - शासनाने लवकरात लवकर समितीच्या मागण्या मान्य करून पात्रताधारकांना न्याय मिळवून द्यावा.ही मागणी पात्रताधारक प्राध्यापकांनी केली आहे.आजपर्यंत अनेक आंदोलने झाली त्यातील हे राज्यव्यापी तिसरे आंदोलन आहे. आश्वासनावर या उच्चशिक्षित बेरोजगारांची केवळ बोळवण करण्यात आली. दैनंदिन जीवनाचा गाडा चालवणे अशक्य झाल्याने लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

अन्यथा पुढील महिन्यात काम बंद आंदोलन - शासनाने लवकरात लवकर वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची भरती करून या उच्चशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नेट सेट पीएच.डी धारक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा पुढील महिन्यात काम बंद आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना दिवाळीत फराळ कार्यक्रमाला जायला वेळ आहे.पण गेल्या 3 दिवसांपासून आम्ही त्यांना 15 मिनिटांची वेळ मागत आहों.ते द्यायला देखील तयार नाहीये, अशी खंत देखील यावेळी प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details