पुणे- काल पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला आग लागली होती. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला होता. आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
काही पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला द्यावे -
सीरम इन्स्टिट्युटला ज्या इमारतीला आग लागलेल्या त्या इमारतीचे फायर ऑडिट झालेले होते. आता ते पुन्हा करण्यात येणार आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच पाण्याचे फवारे असलेली यंत्रणा सुरू झाली होती, अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. तसेच काही लोक या घटने बाबत शंका घेत आहेत. त्यांच्याकडे काही पुरावे, असतील तर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला द्यावे, उगाच अफवा पसरवू नये, असेही त्यांनी यावेळी म्हटले. या घटनेमुळे इथले कर्मचारी, शास्त्रज्ञ यांच्या मनोबलावर कुठलाही परिणाम झालेला नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.