महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Neelam Gorhe : 'माझा न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास'; राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया - माझा न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास

राहुल शेवाळे यांच्या आरोपावर विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे. निलम गोऱ्हे यांनी दीनानाथ रुग्णालयात जाऊन गिरीश बापट यांच्या आरोग्याची विचारपूस ( Neelam Gorhe Visit Girish Bapat At Hospital ) केली. त्याशिवाय जयकुमार गेरे यांच्या अपघातावर केंद्राने लक्ष घालण्याची गरज असल्याच त्यांनी म्हटले आहे.

nilam gorhe
नीलम गोऱ्हे

By

Published : Dec 25, 2022, 8:11 PM IST

राहुल शेवाळे यांच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंकडून मत व्यक्त

पुणे :शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी महविकास आघाडीवर आरोप केला ( Rahul Shewale Criticize Mahavikas Aghadi ) आहे. यावर शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपले मत व्यक्त करत माझा न्याय व्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. न्याय व्यवस्था पूर्णपणे सक्षम आहे अस म्हटले आहे. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी आज खासदार गिरीश बापट यांची पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात जाऊन भेट ( Neelam Gorhe Visit Girish Bapat At Hospital ) घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

संयुक्त महाराष्ट्रासाठी सीमा वासियांच्या बाजूने : सध्या नागपूर येथे अधिवेशन सुरू असून अनेक विषयांवर चर्चा होणे बाकी आहे. विशेष करून संयुक्त महाराष्ट्राच्या विषयावर एक मुखाने आम्ही सर्वजण सीमा वासियांच्या बाजूने आहोत असा ठराव करावा अस मी पत्र दिलेले आहे. त्याबाबत राज्यशासन तसा ठराव करणार आहे. तसेच विधानपरिषदेत देखील असा प्रश्न दाखल करण्यात आलेला आहे अस देखील यावेळी गोऱ्हे म्हणाले. खासदार गिरीश बापट यांची आज भेट घेतली. त्यांना त्रास होत आहे. म्हणून त्यांना दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात ( Neelam Gorhe Visit Girish Bapat At Dinanath Hospital ) आले आहे. त्यांच्या तब्यतीत सुधारणा होत असून लवकरच ते बरे होणार आहेत. त्यांच्याशी बोलत असताना ते अलर्ट आहेत असे कळत आहे. अतिशय तत्परतेने त्याचे हावभाव दिसत होते. खासदार गिरीश बापट यांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अश्या शुभेच्छा आम्ही त्यांना दिल्या आहे. असे यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाले.

आमदारांसाठी केंद्राने लक्ष घालण्याची गरज : जयकुमार गोरे यांच्या अपघाताबाबत विचारले असता नीलम म्हणाल्या की, नागपूर टू पुणे आणि नागपूर टू मुंबई अशी जी विमाने आहेत त्यातील नागपूर ते पुणे हा मार्ग अत्यंत गैरसोयीच्या वेळेत आहे. पूर्वी आमदारांसाठी विमान कंपनीकडून विशेष व्यवस्था केली जायची. यात केंद्राने लक्ष घातले तर अधिक योग्य होईल आणि अधिवेशनातील ताण कमी ( Central Govt Need To Pay Attention At MLA Security ) होईल. रात्रीच्या वेळी अनेक लोकांचे अपघात झालेले आहेत. बाळासाहेब नेहेमी म्हण्याचे की रात्रीच्या वेळेस प्रवास करू नये. असे देखील यावेळी गोऱ्हे म्हणाले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details