महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गरजूंना औषधे आणि रुग्णालयांना निधीची कमतरता भासू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आज बारामती तालुक्यातील वैद्यकीय स्थितीचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी अनेक सूचना केल्या असून निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.

By

Published : Oct 10, 2020, 5:20 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती (पुणे) -बारामती तालुक्यामधील वैद्यकीय महाविद्यालय व इतर वैद्यकीय बाबींसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकचा निधी हवा असल्यास तशी मागणी करावी. तालुक्यातील नागरिकांसाठी कोरोना उपचारासाठी लागणारी रेमडीसीवर इंजक्शनचे 500 डोस शरदचंद्र पवार यांचेतर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुढे सुद्धा गरजेनुसार टप्प्या टप्प्याने इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येतील, त्याचा गरजू रुग्णांसाठी वापर केला जावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानमध्ये पार पडली. तालुक्यामधील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून व समन्वयाने काम करावे. कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखले जाईल, याची काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सध्या जनावरांमध्ये 'लम्पी स्किन' या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा आजार गोचिड, गोमाशी, माश्या, डास व दुधाची भांडी, माणसांचा संपर्क इत्यादीपासून होत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पाळीव जनावरांना लसीकरण करून घ्यावे व जनावरांच्या गोठ्यात व आसपासचा परिसर स्वच्छ राहील, याची काळजी घ्यावी. दूध संघ, सहकारी संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतची बैठक घेऊन या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजना करणे देखील गरजेचे असल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

या बैठकीत राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार- 2020 मिळालेल्या हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता विलास चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच राजेंद्र दादासाहेब होले यांची शिक्षक सोसायटी बारामतीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील उपमुख्यमंत्री पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्य अभियंता (महावितरण) सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव आदी उपस्थित होते.

हेही वाचा -'ही' कंपनी देशात ५.४८ लाख नोकऱ्या देण्याचे करणार नियोजन

ABOUT THE AUTHOR

...view details