पुणे -महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर उपाययोजना करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी उर्से टोल नाका येथे पुणे-मुंबई महामार्ग रोखून धरला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही. दरम्यान, शंभरच्यावर आंदोलनकर्त्यांना तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
'ना चोर ना चौकीदार, मी तर बेरोजगार'.. राष्ट्रवादीचे रस्तारोको आंदोलन; शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात - पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग
पुणे-मुंबई महामार्ग रोखून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. वाढती बेरोजगारी, महापरिक्षा पोर्टल रद्द करा, जुन्या कायद्याप्रमाणे पोलीस भरती या मागण्या होत्या.
आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी शेकडो पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही मिनिटे रोखून धरला होता. वाढती बेरोजगारी, महापरिक्षा पोर्टल रद्द करा, जुन्या कायद्याप्रमाणे पोलीस भरती करा अश्या विविध मागण्यांसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी काही मिनिटे ठिय्या मांडला. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर झाला नाही. 'ना चोर ना चौकीदार मी तर बेरोजगार', 'गाजर नको रोजगार हवा', 'नरेंद्र देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र' अश्या विविध घोषणा कार्यकर्ते देत होते. अखेर काही मिनिटे महामार्ग रोखल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत मार्ग खुला करण्यात आला.