पुणे - संभाजी भिडेंची इस्रोच्या प्रमुखपदी निवड करावी. अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस परीक्षित तळोकार यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदींनी लिहले आहे. संभाजी भिंडेंनी अमेरीकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्याने त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंत संभाजी भिडेंवर समाजमाध्यमातून टीकाही झाली होती.
सांगलीचे शास्त्रज्ञ भिडे यांची इस्रोच्या प्रमुखपदी निवड करावी, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे पंतप्रधानांना पत्र
संभाजी भिडेंची इस्रोच्या प्रमुखपदी निवड करावी. अशा आशयाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस परीक्षित तळोकार यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदींना लिहले आहे.
इस्रोच्या चांद्रयान - २ मोहिकेडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'चांद्रयान-२'ची मोहीम होती. विशेष म्हणजे, यापूर्वी याठिकाणी कोणत्याच देशाची चांद्रमोहीम झाली नव्हती. मात्र, ही चांद्रयान - २ मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात चंद्राच्या भूपृष्ठापासून केवळ २.१ किमी असताना इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला. मात्र, त्यानंतर संपूर्ण देश शास्त्रज्ञांच्या पाठीशी उभा राहिला.
या मोहिमेनंतर संभाजी भिडे यांनी अमेरीकेने त्याच चांद्रयान एकादशीच्या दिवशी सोडल्यानं त्यांची मोहीम यशस्वी झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे परीक्षित तळोकार पंतप्रधानांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी सांगलीतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ संभाजी भिडेंची इस्रोच्या प्रमुखपदी तत्काळ निवड करावी असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भिडेंच्या वक्तव्याची एकप्रकारे खिल्लीच उडवली आहे.