महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे आंदोलन - Movement against fuel price hike pune

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने प्रचंड वाढ केली आहे. याविरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करत महिलांनी दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे आंदोलन
इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे आंदोलन

By

Published : Feb 6, 2021, 10:50 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे)पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने प्रचंड वाढ केली आहे. याविरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन करत महिलांनी दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला, महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून स्वयंपाक करत केंद्र सराकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माजी नगसेविका शमीम पठाण, शिक्षण मंडळाच्या माजी उपसभापती लताताई ओव्हाळ, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्षा पल्लवी पांढरे, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, चिंचवड विधानसभा अध्यक्षा संगिता कोकणे यांची उपस्थिती होती.

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे आंदोलन

इंधन दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना फटका

पंतप्रधान मोदी यांच्या सत्ताकाळात इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड फटका बसत आहे. सरकारने ‘उज्वला गॅस’ योजनेतून एक कोटी गॅस कनेक्शन देण्याची फसवी घोषणा केली होती. ती सत्यात उतरणार नाही, ही फसवी योजना आहे. कोरोना काळात देश संकटात सापडला असताना देखील केंद्राकडून मोठ्या प्रमाणात महागाई वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी यावेळी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details