पुणे: महाराष्ट्रातुन गुजराती, राजस्थानी लोक निघून गेलेत; तर महाराष्ट्रात काहीही उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केले होते. याविरोधात (against Governors remarks) आज पुणे येथे आंदोलन (NCP protests) करण्यात आले. पुण्यामधील अलका टॉकीज चौकात राष्ट्रवादीच्या (National Congress Party) वतीने आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन मराठी माणसासाठी, मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले.
राज्यपालांना आपल्या पदाची लाज नाही, किंमत नाही, ते काय बोलतात, ते त्यांनाच कळत नाही. त्यामुळे मराठी अस्मिते वरती घाला घालायचा, हा प्रकार आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची ही चाल आहे. हे राज्यपाल नाही तर भाजपच बोलतेय. त्यामुळे राज्यपालांना राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी परत पाठवावे. अशी आमची मागणी आहे, असे रूपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले.