महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NCP Protest Against Pradeep Kurulkar: प्रदीप कुरुलकर यांना फाशी द्या...राष्ट्रवादीचे आंदोलन करत आरएसएसवरून घोषणाबाजी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

आज पुण्यातील बालगंधर्व समोरील झाशीची राणीच्या राणीच्या पुतळ्यासमोर डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांना फासावर चढवण्याची मागणी देखील करण्यात आली.

NCP Protest Against Pradeep Kurulkar
प्रदीप कुरुलकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By

Published : May 9, 2023, 1:43 PM IST

प्रदीप कुरुलकर यांची कसून चौकशी करून त्यांना फासावर लटकवा

पुणे :हनीट्रॅपमध्ये अडकून फसवणूक झाल्याचे एक प्रकरण पुण्यात समोर आले आहे. पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला माहिती दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांना एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. प्रदीप कुरुलकर हे पाकिस्तानी गुप्तहेरांच्या होते संपर्कात, अशा संशयावरून त्यांची रॉकडून चौकशी होत आहे. डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांची कसून चौकशी करा. त्यांना फासावर लटकवा, आणि 'हेच का संस्कार भारती आणि आरएसएसची शिकवण' असे म्हणत आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले आहे.



हनीट्रॅपचे गोंडस नाव : यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, आज प्रदिप करुलकर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा हा समोर आला आहे. आज एखादा विरोधी पक्षातील नेता जर पंतप्रधान यांच्या बाबतीत काही बोलला, तसेच मुस्लिम लोकांची पाठराखण केली, तर त्याला देशद्रोही ठरवले जाते. पण त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 40 वर्ष प्रचारक तसेच कार्यकर्ते राहिलेले प्रदीप कुरुलकर हे देशाची माहिती पाकिस्तानला देत आहे. त्यांना हनीट्रॅपचे गोंडस नाव हे दिले गेलेले आहे. पण मुळात संघाची हीच शिकवण आहे, की देशाची. उभी फूट पाडा आणि विभाजन करा, अश्या सूचना आणि आदेशानुसार त्यांचे स्वयंसेवक हे काम करत आहे. आज संघाने हे मान्य करावे की, आमची शिकवण ही चुकलेली आहे, अशी टिका यावेळी जगताप यांनी केली.

देशप्रेमाचे धडे देऊ नये :कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवले, असे सांगून त्यांचा गुन्हा लपवला जात आहे. हे या देशाचे दुर्दैव आहे. आज आमची मागणी आहे की, न्याय व्यवस्थेने या कुरुलकर यांना सर्वात जास्त दंडाची शिक्षा द्यावी. भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला देशप्रेमाचे धडे देऊ नये, ते आमच्या रक्तात असल्याचे यावेळी जगताप म्हणाले. कुरुलकर यांना एटीएसकडून अटक केल्यानंतर त्यांना आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हेही वाचा : DRDO Director: डीआरडीओ संचालकांची रॉकडून होणार चौैकशी; हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय
हेही वाचा : Saamana Article News: गायब मुलींची धक्कादायक माहिती समोर, ठाकरे गटाची शाह-मोदींवर सडकून टीका
हेही वाचा : Sharad Pawar News: ठाकरे गटाकडून शरद पवारांच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, शरद पवारांनी दिले रोखठोक उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details