महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar : क्रिकेटमधील राजकीय हितसंबंधावरून होतेय टीका, शरद पवारांनी नरेंद्र मोदींची सांगितली 'ती' आठवण - क्रिकेटमधील राजकारणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

क्रिकेटमधील राजकीय हितसंबंधांवरून (reaction on politics in cricket) टीका केली जात असून या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलं (NCP President Sharad Pawar reaction) आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया
NCP President Sharad Pawar

By

Published : Oct 23, 2022, 1:19 PM IST

बारामती : सर्वपक्षीय आघाडीमुळे यंदाची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक (Mumbai Cricket Association Election) राज्यभर गाजली. क्रिकेटर संदीप पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर या नेतेमंडळींनी ताकद लावली होती. त्यामुळे क्रिकेटमधील राजकीय हितसंबंधांवरून (reaction on politics in cricket) टीका केली जात असून या टीकेला शरद पवारयांनी उत्तर दिलं (NCP President Sharad Pawar reaction) आहे.


राजकारण करणाऱ्यांचे अज्ञान :जे लोक राजकारण करत आहेत त्यांचे ते अज्ञान आहे. काही ठिकाणं अशी असतात, जिथे राजकारण आणायचे नसते. जेव्हा मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे प्रतिनिधी होते. ते माझ्या बैठकांना हजर असत. दिल्लीचे अरूण जेटली होते, अनुराग ठाकूर हे हिमाचलचे अध्यक्ष होते. मी देशाचा अध्यक्ष आणि बाकी राज्याचे अध्यक्ष आम्ही एकत्र काम केलं आहे. आमच्या लोकांचे काम हे खेळाडूंना सुविधा देण्याचे आहे, बाकी गोष्टीत आम्ही लक्ष देत नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले (Sharad Pawar reaction on politics in cricket) आहे.

क्रिकेटमधील राजकारणावर शरद पवारांची प्रतिक्रिया


समाजात सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न :काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर या पदयात्रेचं आयोजन केले असून मागील काही दिवसांपासून ते या पदयात्रेत चालत आहेत. ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर यामध्ये काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहेत. याबाबत स्वत: शरद पवार यांनी माहिती दिली. भारत जोडोच्या माध्यमातून समाजात सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आम्ही काही पक्षाचे लोक त्याठिकाणी एकदा जाणार आहोत, असं पवार (NCP President Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे.



मराठवाडा दौऱ्यावर भाष्य :दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावरही भाष्य केलं. कुणी शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी जात असेल तर कशाला शंका घ्यायची? केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करावी आणि त्यातून जर शेतकऱ्यांचा फायदा झाला तर ती चांगली गोष्ट आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली (politics in cricket) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details