महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar Reaction: ओडिशा रेल्वे अपघाताबाबत शरद पवारांचे मोठे विधान, इतिहासातील 'त्या' घटनेची करून दिली आठवण - खासदार शरद पवार प्रतिक्रिया

राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावरून वाद निर्माण झाला होता. त्याच दरम्यान महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद विशेष कार्यकारिणी आणि विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील वारजे येथे करण्यात आले होते.

Sharad Pawar Reaction on Odisha Train Accident
खासदार शरद पवार प्रतिक्रिया

By

Published : Jun 3, 2023, 8:18 PM IST

माहिती देताना शरद पवार

पुणे :ओडिशातील बालासोरा येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 281 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक जण जखमी आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, ओडीशा रेल्वे अपघातामध्ये 288 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. त्याबद्दल सर्वांनी मागणी केली असून त्यातून सत्य लवकरच बाहेर येईल.

लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता राजीनामा :लालबहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री होते. त्यावेळी रेल्वे अपघाताची घटना घडली होती. तेव्हा जवाहरलाल नेहरू हे राजीनाम्याच्या विरुद्ध होते. पण रेल्वे मंत्री म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता.त्यामुळे देशाच्या समोर हे एक उदाहरण असून आजच्या राज्यकर्त्यांनी योग्य वाटत असेल ते करावे अशी भूमिका मांडत केंद्र आणि ओडीशा सरकारला सुनावले.



घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काल ऑन कॅमेरा थुंकले होते. त्या कृतीचे राज्यभर पडसाद उमटत असून शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, राष्ट्राचे, राज्याचे हे काही प्रश्न नाहीत. मी त्यावर भाष्य देखील करू इच्छित नाही. तसेच मत देखील मांडू इच्छित नाही, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली. आज सकाळी कुस्तीगीर परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये दिल्लीतील महिला कुस्तीपटू झालेल्या अन्यायाबद्दल आंदोलन चालू आहे याची चर्चा झाल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. आंदोलनाची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, असे पवार यांनी म्हटले.

लालबहादूर शास्त्री हे रेल्वेमंत्री होते. त्यावेळी रेल्वे अपघाताची घटना घडली होती. रेल्वे मंत्री म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. तसेत शरद पवार हे खासदार संजय राऊतांवर भाष्य देखील करू इच्छित नाही. - खासदार शरद पवार

भयंकर अपघाताची जगभरातील देशांनी घेतली नोंद-शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात एक मालगाडी आणि दोन पॅसेंजर ट्रेनचा समावेश आहे. या अपघातात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि SMVT-हावडा सुपर फास्ट एक्स्प्रेसचे 17 डबे रुळावरून घसरले. गेल्या 15 वर्षांतील हा देशातील सर्वात भयानक रेल्वे अपघातांपैकी एक आहे. या अपघातानंतर जगभरातील अनेक देशांनी दु:ख व्यक्त केले आहे. तर भारतात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा -

  1. Odisha Train Accident ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात 238 नागरिकांचा मृत्यू पहा घटनास्थळाचे ड्रोन शॉट्स
  2. Coromandel Express Accident ओडिशात भीषण रेल्वे अपघात किमान २३३ ठार कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली
  3. Odisha train accident बालासोर रेल्वे अपघाताचे मदतकार्य पूर्ण मृतांच्या संख्येत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details