महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 10, 2020, 6:38 PM IST

Updated : Nov 10, 2020, 7:18 PM IST

ETV Bharat / state

बिहार निवडणूक नव्या पिढीला प्रेरणा देणारी; तेजस्वीने चांगली लढत दिली

तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली. बिहारमध्ये आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही. त्याठिकाणी तेजस्वी यादवांना 'फ्री हॅन्ड' द्यायचा होता. या निवडणुकीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

पुणे
पुणे

पुणे- बिहारमध्ये यावेळी बदल होईल, असे वाटले होते मात्र, निकाल वेगळे दर्शवत आहेत. तेजस्वी यादव यांनी चांगली लढत दिली. बिहारमध्ये आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही. त्याठिकाणी तेजस्वी यादवांना 'फ्री हॅन्ड' द्यायचा होता. या निवडणुकीतून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. ते पुण्यात बोलत होते.

पुण्यातील अमनोरा टाऊनशीपमध्ये छात्रभूज नारसी शाळेचा भूमिपूजन कार्यक्रम शरद पवार यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पवार यांनी बिहार निवडणूक, अर्णब अन्वय नाईक प्रकरण, अमेरिका निवडणुकीवर भाष्य केले.

बिहार निवडणुकीविषयी बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार
नितीश यांचे नुकसान होईल, असे वाटले होते मात्र तसे झालेले नाही

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला, हा प्रकाश पत्रकारांमुळेच आमच्या डोक्यात पडला, असा टोला त्यांनी लगावला. भाजपला बिहारमध्ये जास्त जागा मिळत आहेत. नितीश कुमार यांचे नुकसान होईल, असे वाटले होते. मात्र, तसे झालेले नाही. अन्वय नाईक यांच्या कुटुंबाबरोबरचा फोटो पाच वर्षांपूर्वीचा असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबाबत चिंता व्यक्त केली, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, ज्या घरात दोन आत्महत्या झाल्या त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली असती तर बरे झाले असते, असा टोला त्यांनी लगावला. अमेरिकेचा निकाल स्वच्छ आहे, तरीही ट्रम्प मीच विजयी झालो, असे म्हणत असतील तर ते त्यांच्या वयाला साजेशे नाही

Last Updated : Nov 10, 2020, 7:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details