महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amol Kolhe Resign: खासदार डॉ. अमोल कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार, शरद पवारांसोबत पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणार - Amol Kolhe resignation from MP Post

आज शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात आहे. दुपारनंतर सिल्व्हर ओक येथे शरद पवारांची भेट घेऊन कोल्हे राजीनामा देणार आहे. खासदारकीचा राजीनामा देऊन शरद पवारांसोबत पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Amol Kolhe Resign
खासदार डॉ. अमोल कोल्हे

By

Published : Jul 4, 2023, 9:22 AM IST

Updated : Jul 4, 2023, 9:50 AM IST

पुणे :गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी 9 आमदारांना सोबत घेऊन भाजप आणि शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी झाले आहे. त्यानंतर ही पक्षाची भूमिका नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल. आता राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. यानंतर अजित पवार यांच्यासोबत शपथ विधीला असलेले शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोमवारी आपली भूमिका स्पष्ट करत मी शरद पवारांसोबत असल्याचे सांगितले आहे.

राजीनामा तयार :अजित पवार यांच्या शपथविधीला खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते, यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की मी वेगळ्या कामासाठी अजित पवार यांच्याकडे गेलो होतो. तेथे गेल्यावर आपल्याला भाजपाबरोबर जावे लागू शकते, असे कानावर घालण्यात आले होते. मात्र, लगेच शपथविधी आहे याची माहिती नव्हती. मी जेव्हा शपथविधी कार्यक्रमासाठी राजभवनात गेलो, तेव्हाच मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितले होते. कारण मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही, असे ते म्हणाले.

अमोल कोल्हेंचा राजीनामा : अमोल कोल्हे यांनी मी पवार साहेंबासोबत असल्याचे म्हटले आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, म्हणून त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. खासदार पदाचा राजीनामा ते आज शरद पवार यांच्याकडे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. परंतु आता शरद पवार हे अमोल कोल्हेंचा राजीनामा स्वीकारतात की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. रविवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

Last Updated : Jul 4, 2023, 9:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details