बारामती - अलीकडील बदलत्या काळात एखादे मोठे वाहन घेतल्यास त्या वाहनाची मोठ्या व प्रतिष्ठित व्यक्तीच्या हातून पूजा करण्याचे फॅड आले आहे. मात्र कार्यकर्त्यांसाठी नेहमीच तत्पर असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्याच्या इच्छेखातर त्याच्या नव्या टू व्हिलर गाडीची हार घालून पूजा केली. महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी छाप व दबदबा असणारे तसेच सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे थेटसमजून घेणारे राज्यातील नेतृत्व अशी अजित पवार यांची ओळख आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जोडणारे नेते म्हणून पवारांकडे पहिले जाते. याचाच प्रत्यय काल बारामतीकरांनी अनुभवला.
'दादा' नवी टू व्हिलर घेतलीये, पूजा कराल काय? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वळवला मोर्चा...
अजित पवार यांच्या एका कार्यकत्याने नवी टू व्हिलर घेतली. त्याने आपल्या गाडीची पूजा कराल का? अशी विचारणा चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. तेव्हा पवार यांनी मोर्चा वळवला आणि त्या कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव पूजा केली. तसेच गाडी सावकाश चालवण्याचा मोलाचा सल्लादेखील दिला.
'दादा' नवी टू व्हिलर घेतलीये, पूजा कराल काय?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वळवला मोर्चा...