खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग पुणे - पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतांना अचानक त्यांच्या साडीला आग लागली. आग वेळीच आटोक्यात आल्याने सुळे थोडक्यात बचावल्या. सुळे म्हणाल्या की, 'उद्घाटनाच्या वेळी माझ्या साडीला आग लागली. सर्व हितचिंतक, नागरिक, पक्ष कार्यकर्ते की मी सुखरुप असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.'
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -सुळेच्या साडीला आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करीत असतांना ही घटना घडली. या अपघातात सुप्रिया सुळे यांना सुदैवाने दुखापत झाली नाही. साडीला आग लागल्याचे समजताच त्यांनी ती विझवली.
थोडक्यात बचावल्या सुळे -खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्या अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे रविवारी आयोजित कराटे स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी दिप-प्रज्वलन करतांना त्यांच्या साडीला आग लागली. त्यांच्या वेळीच लक्षात येता त्यांनी तात्काळ आग विझवली.
सुप्रिया सुळे पुढील कार्यक्रमात सहभागी - या घटनेनंतरही सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रम सुरुच ठेवला. तसेच सुळे यांचे सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे पुढील कार्यक्रमातही सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी इतरांनाही काळजी घेण्याचे आवाहन केले. या घटनेनंतर सुप्रिया सुळे जळालेली साडी नेसून पुढील कार्यक्रमाला रवाना झाल्या.
हेही वाचा - Supriya Sule critics : हे तर भाजपचे कट-कारस्थान, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका