महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Supriya Sule News: आजचे जाहिरातीचे डिझाईन हे दिल्लीवरून आले असेल-सुप्रिया सुळे यांचा शिंदे गटाला टोला - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. त्या आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज सुळे पालखीत देखील सहभागी होणार आहेत.

Supriya Sule News
खासदार सुप्रिया सुळे

By

Published : Jun 14, 2023, 2:01 PM IST

Updated : Jun 14, 2023, 3:20 PM IST

खासदार सुप्रिया सुळे

पुणे :मंगळवारी एका जाहिरातीत असे दाखविण्यात आले की,शिंदे फडणवीस यांच्या बाजूने राज्यातील जनतेचा कौल आहे. 42 टक्के लोक शिंदे फडणवीस यांच्या बाजूने असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, 42 टक्के त्यांच्या बाजूने आहे, याचा अर्थ जास्त लोक विरोधात आहे. मेजॉरीटी विन झाली . 42 टक्के जर त्यांच्या बाजूने असतील तर जास्त लोक त्यांच्या विरोधात आहे. सर्व्हे कोणी केला? मी तर त्या वेल विशरच्या शोधत आहे. ज्याने कोट्यावधी रुपये देऊन कालची जाहिरात दिली. आजचे डिझाईन हे दिल्लीवरून आले असेल, तर त्याला नाकारता येत नाही, असे यावेळी सुळे म्हणाल्या.



जाहिरात बदलावी लागली :यावेळी सुळे यांना जाहिरातीमधील सर्व्हेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, हा सर्व्हे कोणी केला आहे, हे पाहावे लागणार आहे. 200 लोकांचा घरात बसून सर्व्हे केला असेल, तर कसे सांगणार? दिल्लीच्या अदृश्य शक्तीमुळे आज जाहिरात बदलावी लागली आहे, असे यावेळी सुळे म्हणाल्या. कालच्या जाहिरातीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरचे कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा आहे. यावर सुळे म्हणाले की, हा देवेंद्र फडणवीस यांचा अपमान आहे. निश्चित त्यांचा अपमान झाला आहे. ते जरी आमचे विरोधक असले, तरी असा अपमान केला गेला नाही पाहिजे. मंगळवारी जाहिरातीच्या माध्यमातून राज्याच्या समोर फडणवीस यांचा अपमान करण्यात आला आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आहे, जर त्यांना अस अपमान मिळत असेल तर त्यांनी एकत्रित कार्यक्रमाला का जावे? असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.


मेट्रोला विरोध नाही :आंबेगाव येथील पाण्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मागच्या पंधरा दिवसांपूर्वी याचा आढावा घेण्यात आला आहे. आम्ही सातत्याने महापालिकेकडे मागणी करत आहे. भाजपची सत्ता असताना 5 वर्ष आणि आत्ता प्रशासन येऊन एक वर्ष होऊन गेले, तरी काहीही होत नाही. माझा मेट्रोला विरोध नाही, पण आत्ता यांच्याकडे मेट्रोसाठी पैसे आहे. रस्त्यासाठी पैसे नाही पण मेट्रोच्या कामासाठी आहे. पाण्यासाठी पैसे नाही, अशी टिका यावेळी सुळे यांनी केली.



सरकारचे राज्यावर लक्ष नाही : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, या राज्य सरकारचे राज्यावर लक्ष नाही. आज कांद्याचा काय भाव आहे? शेतकऱ्याना मदत मिळत नाही. एक वर्षात सरकार येऊन कोणता मोठा बदल झाला आहे? प्रत्येक मंत्र्याला सुपरमॅन केले आहे. ज्या महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले आहे, त्याच महिलांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. हे खूप दुर्दैवी असल्याचे यावेळी सुळे म्हणाल्या.

हेही वाचा :

  1. MP Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळेंनी सायकल चालवून दिला 'नो व्हेहिकल डे'चा संदेश
  2. supriya sule : 'बेटी पढाओ, बेटी बचाओ'चा नारा देणारे सरकार बेटीला न्याय देण्यात अपयशी - सुप्रिया सुळे
  3. Pravin Darekar on Supriya Sule : ३ महिन्यात ५५१० मुली बेपत्ता; 'सुप्रिया सुळेंना गृह खात्यावर बोलायचा...'
Last Updated : Jun 14, 2023, 3:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details