पुणे- पवारसाहेब, तुमचं भाग्य.. बरं झालं तुम्हाला मुलगा नाही. सध्या राष्ट्रवादी या कुटुंबाला सोडून जाणारे सर्व पुरुषच आहेत. एक लक्षात ठेवा कुठलीही लेक स्वत:च्या स्वार्थासाठी स्वत:च्या पंच्चाहत्तर वर्षाच्या बापाला दुसऱ्याच्या दारात वाकायला लावणार नाही. त्यामुळे मी मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी सोडणाऱ्यांना लक्ष केले आहे. त्या सणसवाडी येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या
हेही वाचा - भाजप स्वबळावर लढणार? मुंबईत खलबतं
देशात व राज्यात अनेक वेळा हुंडाबळीच्या शिकार महिला होतात, ती मुलगी आपल्याला होणारा त्रास सांगायला वडिलांच्या दारात जाऊ शकते. मात्र, सर्व हाल सहन करुनही वडिलांना सांगते, बाबा मी सुखी संसारातच नांदतेय. त्यामुळे "जीव देईन पण बापाला दुसऱ्याच्या दारात वाकायला लावणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. आजकाल स्वताच्या स्वार्थासाठी अनेक जण पवारसाहेबांना सोडून चालले असल्याची खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.