बारामती ( पुणे ) - विकास कामासाठी राजकीयस्तरावर एकत्र काम करायचे असेल तर समविचारी पक्ष एकत्र येणे गरजेचे आहे. विकास कामासाठी समविचारी पक्ष एकत्र येऊन राज्याचे भले होणार असेल तर ही चांगली बाब आहे.असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत व्यक्त ( Supriya Sule on alliance with AIMIM ) केले. भाजपला रोखण्यासाठी आम्ही कोणासोबतही आघाडी करायला तयार असल्याची प्रतिक्रिया नुकतेच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
नुकतेच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel on Mahavikas Aghadi ) यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली. सध्या राज्यात तीन पक्षांचे ( Three parties in Mahavikas Aghadi ) सरकार आहे. यापैकी शिवसेना हा पक्ष हिंदुत्वाचा समर्थक मानले जाते. एमआयएम जर महाविकास आघाडीत सामील होणार असेल तर शिवसेनेची काय भूमिका असेल याबाबत बोलताना खासदार सुळे यांनी सावध भूमिका घेतली. त्या म्हणाल्या की, एमआयएमचे नेते नेमके काय म्हणाले, हे मला माहित नाही. याबाबत सदर विषय समजून घेतल्यानंतर बोलता येईल.
हेही वाचा-Embarrassing And Shocking : कोवळ्या कळीला बाप, भाऊ, आजोबा, मामानेही सहा वर्षे उपभोगले