पुणे :प्रयागराज येथे काल रात्री उशिरा माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांच्या समोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेलं जात असतानाच हा हल्ला झाला असून या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर आत्ता विविध नेते मंडळी यांच्याकडून मत व्यक्त केली जातं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की मला या विषयात बोलायचे नाही. अतिक अश्रफ विषयावर भाष्य करणं योग्य वाटत नाही, असे विधान पवार यांनी व्यक्त केलं आहे.
अतिक अश्रफ विषयावर भाष्य योग्य नाही :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांना विचारलं असता त्यांनी आपल मत व्यक्त केलं. तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे हे देखील आंबेगाव गावाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विविध मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज राज्यात नागपुर येथे महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभा घेण्यात येणार आहे.या सभेत अजित पवार भाषण करणार नाही.अस सांगितल जात आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की जयंत पाटील यांनी संभाजीनगर येथे भाषण केल नाही. याच अर्थ ते नाराज झाले अस नाही ना विरोधकांना आत्ता अस बोलायचे आहे. कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताच मुद्दा नाही. आंब्याच्या झाडालाच दगड मारतात अस म्हणत सुळे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.