महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हा तर अधिकाराचा अतिरेक, आयकर विभागाच्या धाडीवर शरद पवारांची टीका - sharad pawar latest news

यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतू अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे. अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा, याचा आता लोकांनीच विचार केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार

By

Published : Oct 7, 2021, 7:54 PM IST

Updated : Oct 7, 2021, 8:24 PM IST

बारामती - एखाद्या विषयासंबंधी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे. परंतु गुरुवारी (दि. ७) अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरी छापे टाकणे हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. बारामतीतील गोविंदबागेत ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा -माझे नातेवाईक असल्यामुळेच तपास यंत्रणेच्या धाडी - अजित पवार

'याचा आता लोकांनीच विचार करावा'

छापेमारीनंतर चौकशी अद्याप सुरू आहे, चौकशीनंतर सविस्तर बोलता येईल असे सांगून पवार म्हणाले, उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्याची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा, आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही. यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतू अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे. अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा, याचा आता लोकांनीच विचार केला पाहिजे.

हेही वाचा -अजित पवार यांची बहिण नीता पाटील यांच्या पुण्यातील घरी आयकर विभागाचा छापा

'नाव न घेता सोमैयांवर टीका'

काही लोक भाषणे करून अथवा पत्रकार परिषदा घेवून आरोप करतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय एजन्सीज कारवाई करण्यासाठी पुढे येतात, ही आक्षेपार्ह बाब असल्याचे पवार म्हणाले. मुंबई ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना घेवून जाणारे लोक शासकीय यंत्रणेचे नव्हते. नंतर खुलासा करण्यात आली, की ते साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. साक्षीदार हे एखादी घटना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी त्यासंबंधी न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावले जातात. कारवाईवेळी पकडणे हे साक्षीदारांचे काम नव्हे. याचा अर्थ या कारवाईत काही पक्षीय लोकांना सामावून घेण्यात आले होते. ड्रग्ज प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे. परंतू ती या पद्धतीने नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Last Updated : Oct 7, 2021, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details