महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'चंपा' म्हटल्यावर चंद्रकांत पाटलांनी रागावण्याचे कारणच नाही' - चंद्रकांत पाटील बातमी

कुणाचाही अनादर करण्याची भूमिका कधीच स्वीकारली जाणार नाही. शरद पवार यांनी आम्हाला हे कधीच शिकवले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Nov 23, 2020, 5:41 PM IST

पुणे -भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे अभ्यास नसल्याने छोटे नेते असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर 'चंपा' असा चंद्रकांत पाटलांचा उल्लेख केला होता.

चारी बाजूने टीका होत असल्याचे पाहून चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सायंकाळी प्रेस घेत शरद पवारांचा अनादर करण्याचा आपला हेतू नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच हे स्पष्ट करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टरबूजा आणि मला चंपा म्हणता हे चालते का? असा सवालही उपस्थित केला होता. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस यांना कुणी टरबुजा म्हणाल्याचे मी तरी आजवर ऐकलेले नाही आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्ममध्ये कोणी उल्लेख केला तर, त्यांनी रागावण्याचे कारणच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अशा वृत्तीला कधीच थारा देत नाही. कुणाचाही अनादर करण्याची भूमिका कधीच स्वीकारली जाणार नाही. शरद पवार साहेबांनी आम्हाला हे कधीच शिकवले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details