महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे, दिलिप वळसे पाटलांची बाप्पा चरणी प्रार्थना - Dilip walse patil ganpati celebration

आज राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील घरीही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

दिलिप वळसे पाटलांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना

By

Published : Sep 2, 2019, 6:01 PM IST

पुणे - आज राज्यभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील घरीही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. वळसे पाटील यांनी सपत्नीक पारंपारिक पद्धतीने गणपती पुजा करुन गणेशाची प्रतिष्ठापना केली. राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना बाप्पा चरणी केल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्यातच गणेशोत्सव आल्याने धावपळीच्या दिवसांतही गणरायाची राजकीय मंडळी अगदी मनोभावे पारंपारिक पद्धतीने पुजा करुन प्रतीष्ठापणा करत आहेत.

दिलिप वळसे पाटलांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असताना विधानसभेच्या तयारीला लागला आहे. गणरायाच्या आगमनाने पक्षाला उभारी घेण्याची ताकद मिळू दे. राज्यातील शेतकऱ्यांची संकटे दुर होवू दे आणि माझा बळीराजा सुजलाम् सुफलाम् होवू दे अशी बाप्पाकडे प्रार्थना केल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details