पुणे -सहकार क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, बँका, सहकारी सुतगिरण्या चालविणाऱ्या लोकांना इकडून तिकडे खेचणे अगदी सोपे आहे. कारण या काळात अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी सहकारी चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केंद्र व राज्यातील सरकार मिळून करत आहे, असा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांनी आज मंचर येथील पत्रकार परिषदेत केला
सहकार चळवळ मोडीत काढून सरकारचा राजकिय मेगाभरतीचा डाव - वळसेपाटील - dilip walse patil comments on government
सहकारी चळचळ मोडीत काढण्याच्या नावाखाली संस्था चालक, सहकारी बँका, सुतगिरण्या, कारखाना मालकांना दबाव टाकत कारवाईची भीती दाखविली जात आहे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांचा आरोप.
सहकारी चळचळ मोडीत काढण्याच्या नावाखाली संस्था चालक, सहकारी बँका, सुतगिरण्या, कारखाना मालकांना दबाव टाकत कारवाईची भिती दाखविली जात आहे. नोटाबंदीनंतर सर्वत्र मंदीची एक लाट पसरली आहे. खासगी व सरकारी सहकारी संस्था व बँकांना कारवाईच्या नावाखाली भीती दाखविली जाते आणि त्यातून मेगाभरती केली जात असल्याचा थेट आरोप वळसे-पाटलांनी सरकारवर केला आहे.
आज देशाच्या विकासवृद्धीचा दर कमी होत चालला आहे. देशातील उद्योगांमध्ये शितलता येऊन उद्योगात कमी उत्पन्न होत आहे. यामुळे नव्याने होणारी उद्योगांची गुंतवणूक थांबली असून यातून रोजगार कमी होऊ लागला आहे. हिच संधी पाहून अनेकांना सरकार अडचणीत आणून पक्षांतर करायला भाग पाडत आहे. हे दुदैवी असून यात पुढील काळात सामान्य शेतकरी, मजूर भरडला जाणार असल्याची भीती वळसेपाटलांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.