महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुम्ही महाराष्ट्राच्या भविष्याचे मारेकरी - अमोल कोल्हे

महाघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ यवत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हे यांनी सरकार करत असलेल्या जाहिरातींचा समचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे

By

Published : Oct 15, 2019, 8:16 PM IST

Updated : Oct 16, 2019, 2:31 PM IST

पुणे- पाच वर्षापूर्वी 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' अशी जाहिरात करत भाजप सत्तेत आले. आज हे 'सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी' अशी जाहिरात करत आहेत. मात्र, ५ वर्षात १६ हजार शेतकरी आत्महत्या करतात, १६ हजार माता-भगिनींच्या कपाळाचे कुंकु पुसले गेले, त्यांची मुले अनाथ झाली, याला जर सेना-भाजप सरकार सर्वोत्तम कामगिरी म्हणत असेल तर महाराष्ट्राची जनता त्यांना म्हणेल, 'जर ही तुमची सर्वोत्तम कामगिरी, तर तुम्ही महाराष्ट्राच्या भविष्याचे मारेकरी' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व स्टार प्रचारक डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची जाहीर सभा

हेही वाचा- भाजप शेतकऱ्यांच्या संसाराची होळी करतयं, कर्डीलेंना चूकन साथ दिली - शरद पवार

महाघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ यवत येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणतात पैलवान समोर दिसत नाही. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो मुख्यमंत्र्यांकडे पुढून, मागून खालून वरून कुठूनही पाहिले तरी हा गडी पैलवान वाटत नाहीत. हे जेव्हा म्हणतात समोर पैलवानच दिसत नाही मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ, गुजरातचे आमदार महाराष्ट्रात आखाडा खणायला येतात का, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.

हेही वाचा- लग्नासाठी गड-किल्ले भाड्याने देणे गैर नाही, उलट अर्थव्यवस्थेला फायदा - उदयनराजे भोसले

Last Updated : Oct 16, 2019, 2:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details