पुणे - सध्या जे खातेवाटप झाले आहे, ते फक्त नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. तसेच आता सरकारमधील सहाही व्यक्ती अनुभवी आहेत. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनानंतर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्ज माफी संदर्भात विधिमंडळात निर्णय घेतला जातो, आधीच सरकारवर पावणे सात लाख कोटीच कर्ज आहे. या सगळ्या बाबी पाहून अभ्यास करून शेतकरी कर्ज माफी केली जाईल, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पवार शहरात आले. यावेळी हॉटेल ग्रँड एक्झाटिकामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पत्रकारांशा संवाद साधताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार. हेही वाचा -मंत्रिपद घेवून भगवानगडावर या; नामदेव महाराज शास्त्रींचे धनंजय मुंडेंना निमंत्रण
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, गेल्या नोव्हेंबर महिन्यात अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिन्ही नेते एकत्र आले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. आता आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. 5-6 खाते एकटा व्यक्ती सांभाळू शकत नाही. त्यामुळे माध्यमामंध्ये ज्या काही अफवा किंवा बातम्या सुरू आहेत त्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका अधिवेशनानंतर स्पष्ट होईल, असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागपूर अधिवेशनाला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड बद्दल बोलताना ते म्हणाले, शहराने आम्हाला खूप सहकार्य केले आणि त्यामुळेच आमचे 10 आमदार निवडून आले. शहराने पक्षाला ताकद दिली. गेल्या 20 वर्षांपासून मी शहराचे नेतृत्व केले आहे. शहरात मेट्रोचे काम, कचऱ्याची समस्या सोडविण्यावर पालकमंत्र्यांना भूमिका बजवावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.