पुणे - अजित पवारांची भाजपशी असलेली जवळीक पुन्हा समोर आली आहे. आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या बाजुला बसलेले दिसले. या भेटीबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी छेडले असता, आमच्यात हवा पाण्यावर चर्चा झाल्याचे पवारांनी मिश्कीलपणे सांगितले.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, देवेंद्र फडणवीस आणि माझी बैठक व्यवस्था आयोजकांनी एकमेकांच्या बाजूला केली; आणि हा निव्वळ योगायोग असल्याचे पवार म्हणाले. तसेच राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो, असे सांगून संजय शिंदे यांच्या आग्रहामुळे कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीसांशी फक्त 'पाऊस-पाणी ठिक ना', याच विषयावर चर्चा झाल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा -सरकारने हिंदू-मुस्लिम फाळणी केली आहे; शिवसेनेचा अग्रलेखातून भाजपवर निशाणा