महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ajit Pawar on Sanjay Raut : अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात संघर्ष सुरूच; अजित पवार म्हणाले कोण संजय राऊत? - Shivsena Mp Sanjay Raut

अजित पवार आणि संजय राऊत या दोन नेत्यांमधील मतभेद चालूच आहेत. आज अजित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊतांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, कोण संजय राऊत? असे अजित पावर म्हणाले आहेत.

Ajit Pawar on Sanjay Raut
अजित पवार म्हणाले कोण संजय राऊत?

By

Published : Apr 21, 2023, 2:16 PM IST

Updated : Apr 21, 2023, 3:06 PM IST

अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात संघर्ष सुरूच

पुणे : राज्याच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा अजित पवार यांना संजय राऊत यांच्या बाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कोण संजय राऊत? मी कोणाचे नाव घेतलेच नव्हते, कोणाच्या अंगाला का लागावे मी याआधी देखील आमच्या पक्षाबद्दल बोललो होतो. असा टोला यावेळी अजित पवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्च २०२३ अखेरील आर्थिक स्थितीबाबत व विविध योजनांच्या संदर्भात आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.



न्यायलयीन चौकशी व्हायला पाहिजे : यावेळी पवार यांनी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या घटनेबाबत राज्यपाल यांना पत्र लिहिले आहे. त्याबाबत पवार म्हणाले की, या दुर्घटनेबाबत अजूनही निश्चित आकडा मिळत नाही. सरकार एक आकडा सांगत आहे. मात्र सरकार जे सांगत आहे, त्यात आणि इतरांच्यात तफावत दिसत आहे. आम्ही सरकारमध्ये असताना कधीही कोरोनाच्या बाबतीत आकडेवारी लपवली नाही. वस्तुस्थिती ही लोकांच्यासमोर यायला हवी. मी राज्यपाल यांना तश्याच पद्धतीने मागणी केली आहे की, याची न्यायलयीन चौकशी व्हायला पाहिजे. त्या घटनेचे व्हिडियो पहिले तर परिस्थिती खूप भयावह आहे.


वस्तुस्थिती ही समोर आली पाहिजे :जी माहिती समोर येत आहे, त्यात तफावत आहे, खरी वस्तुस्थिती समोर यायला हवी. सरकारने जी कमिटी स्थापन केली आहे, त्या कमिटीद्वारे नव्हे तर न्यायलयीन समिती मार्फत चौकशी व्हावी आहे. सरकारने या कार्यक्रमाला 13 ते 14 कोटी खर्च केले असे सांगितले जात आहे. मी माहिती अधिकारात संपूर्ण कार्यक्रमाबाबत माहिती मागवलेली आहे. आजपर्यंतच्या महाराष्ट्र भूषणच्या कार्यक्रमाच्या इतिहासात कोणत्या कार्यक्रमाला एवढा खर्च झाला नाही. एवढा खर्च होऊनही का कार्यक्रमात आलेल्या नागरिकांची हाल झाले? सहा तासांमध्ये त्यांच्या पोटात अन्न नव्हते,असे पोस्टमार्टममध्ये माहिती समोर आली आहे. त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी करून वस्तुस्थिती ही समोर आली पाहिजे.



अजूनही त्या बैठकीचे निमंत्रण नाही :मराठा आरक्षणाच्या संदर्भातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यावर पवार म्हणाले की, याबाबत जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. त्याबाबत सरकारने तज्ञ लोकांना तसेच विरोधातील लोकांना विश्वासात घ्यावे आणि याबाबत काय केले पाहिजे हे सरकारने ठरवले पाहिजे. आज मुख्यमंत्री यांनी याबाबत बैठक बोलावली आहे, यावर पवार म्हणाले की, मला अजूनही त्या बैठकीच निमंत्रण नाही. कोणाला बोलावलं माहीत नाही. त्यांनी कोणाला बोलवावं हा त्यांचा अधिकार आहे. असे देखील यावेळी पवार म्हणाले आहे.


शरद पवारांनी अदाणींची भेट घेतली नाही: अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. याबाबत पवार म्हणाले की, शरद पवारांनी अदाणींची भेट घेतली नाही. अदाणी हे शरद पवार यांच्याकडे गेले असे मी वाचले. अदाणींवरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यांची आधीपासून ओळख आहे. त्यामुळे त्यांनी भेटण्यात काही गैर वाटत नाही. विद्यापीठाच्या बाबतीत पवार म्हणाले की, विद्यापीठातील रॅप साँग चित्रीकरण हा गंभीर प्रकार आहे. मी चौकशीचे पत्र दिले आहे. मी कुलगुरूंशी बोललो, योग्य कारवाई व्हायला पाहिजे, सत्य बाहेर आले पाहिजे. तसेच दोषींवर कारवाई केली पाहिजे.



अजित पवार यांनी लगावलाटोला : शरद मोहोळ यांच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेशाबाबत पवार यांना विचारण्यात आले. यावर पवार म्हणाले, हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे. पण जनतेने राज्यकर्ते कुठल्या स्तराला चाललेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. माझ्याकडून मागे एक चूक झाली होती ती मी सुधारली. चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण मंत्री आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी काही विचार केला असावा, असा टोलादेखील यावेळी त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची भावी खासदार म्हणून होर्डिंग्ज लागली असतील तर त्यांना शुभेच्छा. निवडणुकीबाबत अजुनपर्यंत निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रशांत पुण्यातून लढणार की, शिरूरमधून की, आणखी कुठून हे कुठे सांगितले. आम्ही पुण्यात कुणाची कुठे किती ताकद या सगळ्याचा विचार करून उमेदवारीबाबत निर्णय घेणार, असे देखील यावेळी पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा:NCP Meeting Mumbai मुंबईत राष्ट्रवादीचा मेळावा निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचे नावच नाही पुन्हा चर्चा सुरू

Last Updated : Apr 21, 2023, 3:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details