महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उदयनराजे राष्ट्रवादीतच, भाजपकडून पक्षांतराच्या अफवा पसरवल्या - धनंजय मुंडे - शरद पवार उदयनराजे भेट

उदयनराजे भोसले यांनी पवार यांची पुण्यात भेट घेतली. तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती. बैठकीला विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे हेही उपस्थित होते. उदयनराजे यांनी पवार यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाच्या चर्चेला ब्रेक लावल्याचे म्हटले जात आहे.

धनंजय मुंडे

By

Published : Sep 12, 2019, 6:41 PM IST

पुणे -विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरराष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या ते संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या चर्चांना फेटाळून लावत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुडेंनी उदयनराजे राष्ट्रवादीत असल्याचे म्हटले आहे.

उदयनराजेंची कोणतीही नाराजी नसून ते पक्षातच आहेत. ते कधीही भाजपच्या प्रवेशावर बोलले नाहीत. मात्र, भाजपच्या गोटातून ही चर्चा केली जात आहे. जनतेचे लक्ष्य मूळ समस्यांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपने हा खटाटोप चालवला आहे आणि उदयनराजे राष्ट्रवादीतच असल्याचे मुंडे म्हणाले.

उदयनराजे राष्ट्रवादीतच, भाजपकडूनच पक्षांतराच्या अफवा पसरवल्या जातात - धनंजय मुंडे

हेही वाचा - सांगलीचे शास्त्रज्ञ भिडे यांची इस्रोच्या प्रमुखपदी निवड करावी, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे पंतप्रधानांना पत्र

शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी उदयनराजे यांच्या गैरहजेरीमुळेही तर्क-वितर्क लावले जात होते. यावर मुंडे म्हणाले, उदयनराजे यांच्यामागे इतर कामांचा व्याप होता. त्यामुळे ते शिवस्वराज्य यात्रेला येऊ शकले नाहीत.

गुरुवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांनी पुण्यात भेट घेतली. तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती. बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे हेही उपस्थित होते. उदयनराजे यांनी पवार यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाच्या चर्चेला ब्रेक लावल्याचे म्हटले जात आहे. उदयनराजे राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे निश्चित झाल्याचही म्हटले जात आहे.

हेही वाचा - 'दंगल गर्ल'ने दिला पोलीस उपनिरीक्षकपदाचा राजीनामा, भाजपकडून निवडणूक लढवणार?

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुका व प्रचाराची रणनिती या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे सांगितले.

हेही वाचा - कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहात; चंद्रकांत पाटलांनी ढोलाच्या तालावर धरला ठेका

ABOUT THE AUTHOR

...view details