पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी फेसबुक लाईव्ह करत स्वतः हा झालेल्या आजाराबद्दल माहिती देत 'ही तर नव्या आयुष्याची सुरुवात अस म्हटल आहे. काही दिवसांपूर्वी जगताप यांना प्यारालीसिसचा अटॅक येऊन गेल्याची माहिती त्यांनी फेसबुकव्दारे ( Facebook Live ) सांगितली आहे. चेहऱ्याच्या डाव्या बाजूला हा झटका आला आहे.
NCP City President : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी स्वतः हाच दिली, आपल्या आजाराबद्दल माहिती...( पाहा व्हिडिओ )
वानवडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रशांत जगताप हे सुरवातीला नगरसेवक झाले आणि मग त्यांना पक्षाने महापौर पद दिलं आणि गेल्या 2 वर्षापासून जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.
माझ्या आजाराची माहिती कोणालाच कळाली नव्हती. मी अनेकांना भेटलो, पत्रकारांना भेटलो, कार्यकर्त्यांनाही भेटलो, पण त्यांनाही माझ्या चेहऱ्यात कोणताही बदल जाणवला नाही. मी जेव्हा माझा एक फोटो पाहिला, तेव्हा मला काहीतरी झालंय असं लक्षात आलं. म्हणून, मी डॉक्टरांना भेटायला गेलो असता, त्यांनी मला प्यारालीसिसचा झटका येऊन गेल्याचे सांगितले आहे. आत्ता ही नवीन आयुष्याची सुरवात असल्याचं यावेळी जगताप यांनी सांगितल आहे.
वानवडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रशांत जगताप हे सुरवातीला नगरसेवक झाले आणि मग त्यांना पक्षाने महापौर पद दिलं आणि गेल्या 2 वर्षापासून जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. शहराध्यक्ष पदावर आल्यानंतर अनेक आंदोलने, तसेच शहरातील विविध विषयांवर पालिकेत ( Municipal Corporation ) प्रश्न मांडण्यासाठी जगताप हे नेहेमी सक्रिय असत. आज त्यांना झालेल्या नवीन आजाराबद्दल माहिती दिल्यानंतर अनेक लोक, कार्यकर्ते यांनी जगताप यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.