पुणे : चंद्रकांत पाटील हे फार सर्वशक्तीमान आहेत. ते त्यांचे कोल्हापूर सोडून इकडे पुण्यामध्ये कोथरूडला निवडणूक लढवायला आले. नेमके त्यांचे कोथरूडसाठी योगदान तरी काय? असा सवाल शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना विचारला आहे. ज्या माणसामध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये निवडून येण्याची क्षमता नाही. त्याच्यावर काय भाष्य करावे असे खडे बोलदेखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहेत.
शरद पवार यांनी सुनावले खडे बोल : चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री झाल्यापासून सातत्याने पुणे जिल्हा, कोणाचीही मक्तेदारी नाही पुणे जिल्हा हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. अशा प्रकारची वक्तव्य करतात, यावर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीवर भाष्य : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरदच पवार पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्याने अनेक विषयावर चर्चा केली आहे. नाशिकच्या सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवर माझ्याशी काही चर्चा झालेली नाही. परंतु हा प्रश्न काँग्रेसने बसून मिटवला असता तर मिटला असता, आता हे मिटू शकतो असं म्हणत शरद पवार यांनी या सगळ्या प्रकरणांमध्ये सस्पेन्स निर्माण केला आहे.