महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar on Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवारांची गुगली; पवार-फडणवीसांमध्ये वाकयुद्ध, पाहा कोण झाले बोल़्ड

पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा डाव होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावरून शरद पवार यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. माझा या शपथविधीला पाठिंबा असता तर ते सरकार दोन दिवसात कसे कोसळले? असा सवाल पवार यांनी फडणवीसांना विचारला आहे. तसेच पवार यांच्या गुगलीने अजित पवार बोल्ड झाले की देवेंद्र फडणवीस बोल्ड झाले यावरून आता वाकयुद्ध रंगले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 29, 2023, 4:55 PM IST

Updated : Jun 29, 2023, 9:25 PM IST

शरद पवार-देवेंद्र फडणवीसांमध्ये शाब्दिक वॉर

पुणे - पहाटेच्या शपथविधीवरून अजूनही राजकारण सुरू आहे. पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा होता. तसेच त्या सर्व गोष्टी शरद पवार यांना माहिती होत्या अशा चर्चा आहेत. त्याबाबतचे मोठे गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यावरून शरद पवार यांनी गुरुवारी भाष्य केले आहे. गुगलीने फडणवीस बोल्ड झाल्याचे पवार यावेळी म्हणाले. तर पवार यांच्या गुगलीने मी नाही तर त्यांचे पुतणे म्हणजे अजित पवारच बोल्ड झाल्याचे फडणवीसांनी सांगितले.

शरद पवार यांचा पलटवार - देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या पहाटे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याला हादरा दिला होता. त्यानंतर दोन दिवसात ते सरकार कोसळले होते. यावरून राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही. पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. यावर शरद पवार म्हणाले की, या शपथविधीला जर माझा पाठिंबा असता तर हे सरकार लगेच दोन ते तीन दिवसात कसे कोसळले? सत्तेसाठी देवेंद्र फडणवीस हे कोणाकडेही जाऊ शकतात, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार-देवेंद्र फडणवीसांमध्ये वाकयुद्ध -

पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता. एवढंच नव्हे तर 'भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. पण 'शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी ऐनवेळी पवारांनी माघार घेतली - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मी माघार घेतली मग पहाटे शपथ का घेतली? माझा पाठिंबा होता तर सरकार 2 दिवसात कसे पडले? सत्तेसाठी फडणवीस वाटेल ते करू शकतात. फडणवीसांची अस्वस्थता बाहेर येणे गरजेचे आहे. विकेट गेलेला माणूस विकेट गेली कसे सांगतो. अजित पवार हे चेंडू नव्हते तर गुगलीवर फडणवीसांनी विकेट टाकली - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष

शेवटी शरद पवार यांना सत्य सांगावे लागले. मी जी गुगली टाकली त्यामुळे त्यांचे सत्य बाहेर आले पण ते अर्धेच आले आहे. अजून उरलेले सत्य मी बाहेर काढेल, त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड होण्याऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच बोल्ड झाले आहेत. त्यांनी स्वत: पुण्याला बोल्ड केले आहे. मी उरलेले सत्य लवकरच बाहेर काढेल - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

शरद पवारांची फडणवीसांवर टीका - राज्यातील महिलांच्या सुरक्षेवरून शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मागील दीड वर्षात राज्यातून ६ हजार ८८९ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे शरद पवार म्हणाले. राज्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. राजकारण करण्यापेक्षा या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

फडणवीसांचा गौप्यस्फोट - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे आणि गौप्यस्फोट केले आहेत. पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव होता, असा मोठा दावा फडणवीसांनी केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. पण 'शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी ऐनवेळी पवारांनी माघार घेतली, असा दावा फडणवीसांनी केला आहे. शिवाय सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी दगाबाजी करून पाठीत खंजीर खुपसल्याचाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.

शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून जनसंघाबरोबर घरोबा केला होता. पवारांची ती खेळी म्हणजे मुत्सद्येगिरी आणि त्यापेक्षा अधिक मेरीटवर केलेली शिंदेंची खेळी का मुत्सद्येगिरी नाही - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीसांनी पवारांना डिवचले - शरद पवार यांनी 1978 मध्ये काँग्रेसचे सरकार पाडत जनसंघासोबत घरोबा केला. काँग्रेसमधून 40 आमदारांसोबत बाहेर पडलेले शरद पवार यांच्या त्या खेळीला मुत्सद्देगिरी म्हणायचे आणि त्यापेक्षा अधिक मेरीटवर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या खेळीला म्हणायचे नाही, हा दुटप्पीपणा का एवढेच फक्त आपण विचारले होते. त्यावेळेस मी प्राथमिक शाळेत होतो की, जन्माला यायचा होतो याचा काहीही संबंध नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला होते. देवेंद्र फडणवीस यांनी 1978 च्या राजकीय खेळीचा उल्लेख केल्यानंतर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी प्राथमिक शाळेत होते, अशी टिप्पणी केली होती, त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.

शरद पवारांचा पलटवार

विरोधी पक्षाची पुढील बैठक बेंगळुरुला - विरोधी पक्षांची पुढील बैठक 13-14 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे. ही बैठक सुरुवातीला शिमला येथे नियोजित करण्यात आली होती. मात्र, तीआता बेंगळुरू येथे होणार असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar criticizes BJP : राज्यात महिला गायब होण्याचे प्रमाण वाढले, पवारांचा घणाघात, मोदींनाही सुनावले खडे बोल
  2. New Opposition Leader : दोन दिवसांत विधानसभेतील नविन विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा?, विश्वसनीय सूत्रांची माहिती
  3. Devendra Fadnavis: पवार करतात ती मुत्सद्देगिरी, मग शिंदेंनी केल्यावर का झोंबते? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
Last Updated : Jun 29, 2023, 9:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details