पुणे - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातून भाजप-सेनेते जाणाऱ्यांची नावे समोर येऊ लागल्यानंतर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि संग्राम जगतापही पक्षाला राम-राम करणार, अशी चर्चाही होती. मात्र, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार शिवेंद्रराजे भोसले, संग्राम जगताप, राहुल जगताप कुठेही जाणार नाहीत, ते पक्षातच राहणार असल्याचा खुलासा केला आहे.
आमदार शिवेंद्रराजे भोसले, संग्राम जगताप कुठेही जाणार नाहीत - शरद पवार - राहुल जगताप
साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि संग्राम जगतापही पक्षाला राम-राम करणार, अशी चर्चाही होती. मात्र, यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला असून शिवेंद्रराजे भोसले, संग्राम जगताप जाणार नाहीत, असे पवार म्हणाले.

शिंवेद्र मला स्व:त भेटेले आहेत. ते पक्ष सोडून कुठेही जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आज माझी पत्रकार परिषद असल्याचे समजताच श्रीगोद्यांचे आमदार राहुल जगताप, नगरचे संग्राम जगताप यांनी मला स्वत:हून फोन करून आम्ही राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे तुम्हीच सर्वांना सांगा, असे सांगितले असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले. त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले, संग्राम जगताप आणि राहुल जगताप यांच्या पक्षांतर विषयावर पडदा पडला आहे. श्रीगोंद्याचे राहुल जगताप हे देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते.
संग्राम जगताप हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमधून सुजय विखे-पाटलांच्या विरोधात लढले होते. तर साताऱ्यात भावबंधकीच्या वादातून नाराज असलेले शिवेंद्रराजे पक्ष सोडणार अशी काही दिवसांपासून चर्चा सुरू होती.