पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी कोरोनाने निधन झाले. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साने यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी साने यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, दत्ता साने यांचा घातपात झाला असल्याची शक्यता कुटुंबीयांनी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकाच्या कुटुंबीयांची शरद पवारांनी घेतली भेट - शरद पवार नगरसेवक कुटुंब भेट
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी कोरोनाने निधन झाले. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साने यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी साने यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. चिखली परिसरातून साने हे तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
शनिवारी पहाटेच्या सुमारास दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले, ते 47 वर्षाचे होते. चिखली परिसरातून साने हे तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महानगरपालिकेत विरोधी पक्षाची धुरा सांभाळताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असायचे. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेच्या मुख्य दालनात कचरा आणून टाकला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय होते.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी दिवसभरात पिंपरी-चिंचवडमध्ये 336 कोरोनाबाधित रूग्ण आढळले तर 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4 हजार 288 वर पोहोचला असून 2 हजार 765 जण कोरोनामुक्त झाले आहेत.