पुणे - देशात सत्तेचा गैरवापर ( Misuse of power in the country ) केला जात आहे. अधिवेशनात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित होती. परंतु विरोधकांना बोलूच द्यायचे नाही, अशी केंद्राची भूमिका आहे. आजपर्यंत असे चित्र कधी पाहिले नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार ( Sharad Pawar Attack On Government ) यांनी केली. सरत्या वर्षाच्या सायंकाळी बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठी सरकारचे कामलोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठी सरकार काम करत आहे. न्यायालयाने अनिल देशमुख, संजय राऊत यांना जामीन ( Misuse of power in the country ) दिला. त्यातून राज्यातील सत्ताधाऱयांनी काही तरी शिकले पाहिजे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. काही सदस्य आतमध्ये आहेत. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन मिळणे हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले होते. त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम करण्यात आल्याचे दिसत असल्याचे शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar Attack On Government ) हे म्हणाले.