महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंचवड विधानसभेचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी आज बाद झाला आहे.

प्रशांत शितोळे

By

Published : Oct 5, 2019, 7:14 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंचवड विधानसभेचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी आज बाद झाला आहे. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नसल्याने अर्ज बाद झाला. त्यामुळे चिंचवड विधानसभेत आता आमदार लक्ष्मण जगताप विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राहुल कलाटे यांना छुपा पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - आंबेगावातून दिलीप वळसे-पाटील विरुद्ध राजाराम बानखेले अशी रंगणार लढत

चिंचवड विधानसभा मतदार संघात १९ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले होते. अर्जाची शनिवारी छाननी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादीकडून प्रशांत शितोळे, भाजप शिवसेना युतीकडून आमदार लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी पक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राहुल कलाटे विरुद्ध आमदार लक्ष्मण जगताप अशी लढत होणार आहे. दरम्यान, अर्ज बाद झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना छुपा पाठींबा देणार असल्याचे बोलले जात आहेत.

हेही वाचा - बारामतीतून एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

ABOUT THE AUTHOR

...view details