बारामती: Archana Patil Joined BJP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हा निरीक्षक डॉ अर्चना पाटील Dr Archana Patil यांचा आज NCP Baramati leader Archana Patil भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे State President BJP Chandrasekhar Bawankule यांच्या हस्ते मुंबई येथे पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. डॉ अर्चना पाटील यांचे इंदापूर तालुक्यातील लासूर्णे गाव आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील लासूर्णेचे घराणे हे बडे प्रस्थ मानले जाते. डॉ अर्चना पाटील यांचे अजोबा दिनकरराव पाटील यांचा माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या विरोधात विधानसभेला थोड्या मताने पराभव झला होता. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने हर्षवर्धन पाटील यांना चांगले बळ मिळेल.
यापूर्वी त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. डॉ पाटील यांनी इंदापूर तालुक्यासह बारामती लोकसभा मतदार संघात ओबीसी समाजाचा आक्रमक चेहरा म्हणू ओळख आहे. त्या MBBS radiologist आहेत. त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघात अनेक बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा या विधानसभा मतदार संघामध्ये अनेक गाव दौरे केले आहे.