महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपयोगकर्ता कराविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांचे सभागृहात आंदोलन

महापालिकेकडून लागू करण्यात आलेल्या उपयोगकर्ता कराच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी नगरसेवकांनी आज आंदोलन केले.

आंदोलन करताना नगरसेवक
आंदोलन करताना नगरसेवक

By

Published : Mar 12, 2020, 10:32 AM IST

सांगली- महापालिकेकडून लागू करण्यात आलेल्या उपयोगकर्ता कराच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी नगरसेवकांनी आज आंदोलन केले आहे. महासभेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या या कराचा निषेध नोंदवत उपयोगकर्ता कर रद्द करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांचे सभागृहात आंदोलन

सांगली महापालिका प्रशासनाकडून शहरातील नागरिक, व्यापारी, हातगाडी फेरीवाले सर्वांना उपयोगकर्ता कर लागू केला आहे. 450 रुपये शुल्क आकारणीचे नोटिसा सर्वांना पाठवण्यात येत आहेत. मात्र, सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात या कराला विरोध होत आहे. सत्ताधारी भाजपच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांनी आज महासभेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केले आहे. महासभा सुरू असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपयोगकर्ता कराला स्थगिती मिळाली पाहिजे, असे फलक झळकवत या कराच्या विरोधात सभागृहात घोषणाबाजी केली. घन कचरा प्रकल्पाच्या नियमानुसार लागू करण्यात येत असलेल्या या कराच्या आधी घन कचरा प्रकल्पाच्या सुविधांची पूर्तता करावी, मगच हा कर लागू करावा, अशी मागणी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा -मिरजेतील कचरा डेपो, कत्तलखाना हटावसाठी ग्रामस्थांचे महापालिकेविरोधात आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details