पुणे- पवारांशिवाय त्या 'चंपा'ला काहीच दिसत नाही, असे म्हणत अजित पवार यांनी भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. पवार कुटुंबातील तरुण भविष्यात भाजपमध्ये येऊ शकतात. ते आल्यास त्यांचे स्वागत आहे, असे चंद्रकांत पाटील यापूर्वी म्हणाले होते. त्यालाच उत्तर देताना अजित पवार पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'चंपा'ला पवारांशिवाय काहीच दिसत नाही, अजित पवारांनी उडवली भाजप नेत्याची खिल्ली - चंद्रकांत पाटील
अजित पवार यांनी 'चंपा'चे स्पष्टीकरण देखील दिले. 'चंपा' हा शॉर्ट फॉर्म आहे. जसे 'अप' म्हणजे अजित पवार तसेच 'चंपा' म्हणेज चंद्रकांत पाटील, असे पवार म्हणाले. मात्र, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.
!['चंपा'ला पवारांशिवाय काहीच दिसत नाही, अजित पवारांनी उडवली भाजप नेत्याची खिल्ली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4701678-thumbnail-3x2-pawar.jpg)
अजित पवार यांनी 'चंपा'चे स्पष्टीकरण देखील दिले. 'चंपा' हा शॉर्ट फॉर्म आहे. जसे 'अप' म्हणजे अजित पवार तसेच 'चंपा' म्हणेज चंद्रकांत पाटील, असे पवार म्हणाले. मात्र, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.
चंद्रकांत पाटील जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नसतो. प्रत्येक वेळी पवार साहेब राजकारणातून दूर जातील, असेही ते म्हणतात. मात्र, ते कधीच शक्य नाही. शरद पवार यांनी किती चढ उतार पाहिले. ५५ आमदारांपैकी ५० आमदार निघून गेले. ५ आमदार राहिले तरीही तितक्याच तत्परतेने ते बाहेर पडले. आजही शरद पवार हे आक्रमक भूमिकेतून युतीचे सरकार बदलायचे असल्याचे सांगतात, असे अजित पवार म्हणाले.