पुणे -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचे पडसाद पिंपरी - चिंचवडमध्येही उमटले. ईडीने केलेली ही कारवाई बेकायदेशीर आहे. कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. केंद्र सरकार अडचणीत आली की, सत्तेचा गैरफायदा घेते. मलिकांना ईडीने केलेली अटक हे त्याचेच उदाहरण आहे. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुख्य चौकात एकवटले आणि त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी - NCP agitation against arrest of Nawab Malik
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचे पडसाद पिंपरी - चिंचवडमध्येही उमटले. ईडीने केलेली ही कारवाई बेकायदेशीर आहे. कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. केंद्र सरकार अडचणीत आली की, सत्तेचा गैरफायदा घेते.

कोणतीही पूर्वसूचना न देता ईडीने नवाब मालिकांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. आज सकाळी 8 तास चाललेल्या चौकशीनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचे मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केले. तसेच, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गांधी लढे थे गोरो से, हम लढेंगे चोरो से, केंद्र सरकार जब, जब डरती है ईडी को आगे करती है! अशा घोषणा देत भाजपला धारेवर धरले आहे. देशात महागाई वाढली आहे, बेरोजगारी आहे यावर तोडगा न काढता सर्वसामान्यांचे लक्ष वेधण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी म्हटले.
हेही वाचा -Gym for heart patients :हृदय रुग्णांसाठी भारतातील पहिले क्लीनिकल जिम पुण्यात!