पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी दिवाळीनिमित्त गोरगरिबांना शंभर रुपयांमध्ये दिवाळीचे धान्याचे किट देण्याची घोषणा केली होती. परंतु दिवाळी सुरू होऊन सुद्धा ते कीट आले नाहीत. भाजपाने आणि एकनाथ शिंदे यांनी काही लोकांचे कल्याण करण्यासाठी गरीबाची दिवाळी कडू केली, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी केलेला आहे.
100 रुपयात धान्याचे किट, फसवणार्या भाजपचा आलाय विट; राष्ट्रवादीचे राज्य सरकार विरोधात आंदोलन - Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी दिवाळीनिमित्त गोरगरिबांना शंभर रुपयांमध्ये दिवाळीचे धान्याचे किट देण्याची घोषणा केली होती. परंतु दिवाळी सुरू होऊन सुद्धा ते कीट आले नाहीत. भाजपाने आणि एकनाथ शिंदे यांनी काही लोकांचे कल्याण करण्यासाठी गरीबाची दिवाळी कडू केली, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी केलेला आहे.
![100 रुपयात धान्याचे किट, फसवणार्या भाजपचा आलाय विट; राष्ट्रवादीचे राज्य सरकार विरोधात आंदोलन NCP agitation against state government](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16720132-188-16720132-1666435933997.jpg)
भाजपाविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 100 रुपयात खाण्याचे किट भाजपाचा आलाय वीट, असे म्हणत मोठ्या मोठ्या घोषणा देत राज्य सरकार तसेच भाजपाविरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन केलेलं आहे.
गरीबाची चेष्टा केल्याचा आरोप मोठ्या घोषणा झाले आहेत. परंतु, त्यांचे फोटो नाहीत म्हणून किट दिला गेला नाही .सगळ्या वस्तू आणखी पोहोचल्या नाहीत. एकप्रकारे केंद्र सरकार राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गरीबाची चेष्टा केल्याचा, आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेला आहे. त्यामुळे यांचा आता वीट आलेला आहे. म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत .असेही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी म्हणाले आहेत.