महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार - शरद पवारांना ईडीची नोटीस

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात शरद पवारांचे नाव सूडबुद्धीने घालण्यात आले आहे, गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांनी सरकारच्या विरोधात रान उठवले आहे. त्यांच्या प्रचारसभांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहून सरकारने सूडबुद्धीने ईडीला हाताशी धरुन ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

शरद पवार

By

Published : Sep 25, 2019, 7:45 AM IST

Updated : Sep 25, 2019, 8:14 AM IST

पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात ईडीकडून नोटीस काढण्यात आली आहे. या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज(बुधवारी) पुण्यात निदर्शन आंदोलने केली जाणार आहेत. तर शरद पवारांचे बारामती शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे.

प्रदिप गारटकर - राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्य़क्ष

हेही वाचा - माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असेल तर त्याचे स्वागत - पवार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात शरद पवारांचे नाव सूडबुद्धीने घालण्यात आले आहे, गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांनी सरकारच्या विरोधात रान उठवले आहे. त्यांच्या प्रचारसभांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहून सरकारने सूडबुद्धीने ईडीला हाताशी धरुन ही नोटीस पाठवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी बारामती बंद पुकारण्यात आला आहे. तर पुण्यातल्या मंडई येथे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिली.

हेही वाचा - काय आहे शिखर बँक घोटाळा?

Last Updated : Sep 25, 2019, 8:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details