पिंपरी-चिंचवड (पुणे) -उत्तर प्रदेशमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. याविरोधात शनिवारी (दि. 9 जाने.) पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पिंपरी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पत्र पाठवण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातील बदाऊ जिल्ह्यात 3 जानेवारीला एका 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करून, त्या महिलेची हत्या करण्यात आली होती. मात्र, अजूनही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याचा निषेध म्हणून आज (शनिवार) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने पिंपरी पोस्ट कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशातील योगी सरकार हे तेथील गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे आरोप राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे.
महिला अत्याचाऱ्याच्या यादीत उत्तरप्रदेश अग्रेसर