पुणे - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेल ( Petrol Disel Price Hike ) तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत होत असलेल्या महंगाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ( NCP Agitation For Infliation ) गॅस सिलिंडर तसेच तेलाच्या डब्याची अंत्ययात्रा काढत आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
NCP Agitation In Pune : महागाई विरोधात अंत्ययात्रा काढत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन - पुणे राष्ट्रवादी काँग्रेस अंतयात्रा आंदोलन
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेल ( Petrol Disel Price Hike ) तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत होत असलेल्या महंगाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ( Pune NCP Agitation Against Infliation ) गॅस सिलिंडर तसेच तेलाच्या डब्याची अंत्ययात्रा काढत आंदोलन करण्यात आले.
'दरवाढ रद्द करावी' -देशात 5 राज्यांच्या निवडणूक होत्या, त्यामुळे पेट्रोल-डिझेल यांचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. पण जस या 5 राज्यांतील निवडणुका संपल्या तसे पेट्रोल डिझेल तसेच गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. चार दिवसात तीन रूपये पेक्षा जास्त वाढ पेट्रोल-डिझेलमध्ये झाली आहे. तर सिलिंडरच्या किमती 50 रुपये वाढ करण्यात आली आहे, ही दरवाढ लवकरात लवकर रद्द करावी, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. मोदी सरकारने या देशातील जनतेचं कंबरडे मोडण्याच काम केलं आहे. गोर गरीब जनतेला निस्तनाबूद करण्याचा काम मोदी सरकारने केलं आहे. 8 वर्षात मोदी सरकारने फक्त आणि फक्त महागाईत वाढ केली आहे. एकेकाळी 400 रुपयाला मिळणारा गॅस आज 900 रुपयाला मिळत असल्याचे टीका यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.